
दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२३ । मुंबई । नागरी सेवा दिनानिमित्त राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२२-२३ च्या राज्यस्तरीय विजेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पारितोषिके देवून गौरविण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने (प्रशासकीय सुधारणा, रचना व कार्यपद्धती) नागरी सेवा दिन कार्यक्रम २०२३ चे आयोजन शुक्रवार २१ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिली आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांच्या पुढील लिंकवरुन पाहता येईल.
यू ट्यूब – https://youtube.com/live/CXXIWijPMMI?feature=share
फेसबुक – https://www.facebook.com/events/1274511780160163/
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR