आटपाडी मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमा निमित्त श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आटपाडी संस्थेच्या सर्व महाविद्यालयांच्या वतीने व युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑगस्ट २०२२ । आटपाडी । श्रीराम बहुउदेशीय सेवाभावी यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कला व विज्ञान महाविद्यालय व श्रीराम ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त दिनांक 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान कला व विज्ञान महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . दिनांक 13 ऑगस्ट रोजी सध्या जम्मू कश्मीर येथे सैन्य दलात कार्यरत असणारे श्री महादेव गळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी त्यांचा सत्कार कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच दिनांक 14 रोजी वीर पत्नी श्रीमती फुलाबाई सुरेश चव्हाण प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या . त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यांचा सत्कार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.भारती देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक संतोष सावंत यांनी मानले.त्यावेळी सर्वजण उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!