दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑगस्ट २०२२ । सातारा । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महावितरण सातारा मंडळ या ठिकाणी झेंड्याला वंदन करत असताना अधीक्षक अभियंता गायकवाड यांनी आपल्याला असलेला झेंडावंदनाचा अधिकार आपल्याच कार्यालयातील महिला शिपाई नेवरेकर यांना देऊन महिलांचा सन्मान केलेला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अनेक महिलांनी देश उभारणीच्या कार्यामध्ये मोलाचे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये स्त्री शिक्षणाच्या उद्धारकर्त्या सावित्रीबाई फुले सह क्रांतिकारी थोर महापुरुषांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. या जिल्ह्याचा सन्मान अजून वाढवण्यासाठी महावितरण तर्फे हा महिलांच्या हस्ते झेंडावंदन केले. यावेळी कार्यकारी अभियंता, बारटक्के, किरण सुर्यवंशी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.