स्थैर्य, मुंबई, दि.१४: वसंत ऋतूतील वैशाख महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या अक्षय तृतीया सणाचे आपल्या कृषी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. बळीराजाच्या दृष्टीने वर्षभरातील पीक-पाण्याच्या नियोजनासाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो. निसर्गाशी नातं सांगणारा साडे तीन मुहुर्तापैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर अनेक चांगल्या कामांची सुरुवात करण्याची आपली परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत यंदाचा अक्षय तृतीयाचा सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिल्या आहेत.