कृषी दिन व कृषि संजिवनी सप्ताह निमित्त कृषि आयुक्तांनी घेतली महीलांची शेतीशाळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे दि.1 : हरित क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त कृषि दिन व कृषि संजिवनी सप्ताहाचे औचित्य साधून कृषी आयुक्त सुहास दिवसे व महाराष्ट्र राज्याचे वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिपक तावरे, विभागीय कृषि सहसंचालक दिलीप झेंडे, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे शास्रज्ञ सतिश चव्हाण यांनी जांभूळ, तालुका मावळ येथील क्रॉपसॅप अंतर्गत महीलांच्या भात पीक शेतीशाळेत संवाद साधला.

शेतकरांनी कृषी व्यावसायिक म्हणून पुढे यावे. पुणे व मुंबई ही बाजारपेठ मावळ पासून जवळ व शाश्वत असल्याने शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीद्वारे आपली आर्थिक उन्नती साधावी. कोरोना संकट काळातही शेतक-यांनी ग्राहकांना थेट फळे व भाजीपाला घरपोच पुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपल्या गावात शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून विविध प्रकारचा भाजीपाला उत्पादीत करून विपणन व्यवस्था निर्माण करुन आर्थिक स्तर सुधारण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन कृषी आयुक्त दिवसे यांनी केले आहे.

यावेळी श्री.दिपक तावरे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांनी शेतकरांशी संवाद साधताना उत्पादित केलेले अन्न धान्याची साठवण वखारी मध्ये करुन धान्य तारण कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या प्रसंगी विभागीय कृषि सहसंचालक श्री. दिलीप झेंडे यांनी उत्पादन खर्च कमी करुन उत्पन्नात वाढ करणे तसेच कृषि यांत्रिकीकरण योजनेचे लाभ व शेतीशाळा द्वारे कृषि तंत्राचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच  प्रयोगशिल शेतकरी प्रवीण गाडे यांनी भात लागवड करण्यासाठी तयार केलेल्या भात रोपवाटीकेची, रमेश चिंधु काकरे  यांच्या शेतावर  यंत्राद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक यांची पाहणी केली तसेच  काळुराम चिंधु देशमुख यांच्या शेतावर चारसूत्री लागवड तंत्रज्ञानाचे  प्रात्यक्षिकाचे पाहणी केली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल  उपविभागीय कृषी अधिकारी  सुनील खैरनार  सरपंच  गणेश  नागेश, मावळ तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे  मंडळ कृषी अधिकारी विक्रम कुलकर्णी,  कृषी पर्यवेक्षक  उत्तम भान,  दुर्योधन तुपे ,कृषी सहाय्यक श्रीमती शैला जाधव, श्रद्धा कुलकर्णी, प्रियंका पाटील,स्वाती गणवट, घनशाम दरेकर, किरण बोराडे, बाळासाहेब पवार, नितीन बांगर,नागेश शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सूत्रसंचालन श्री संजय ताकवले यांनी केले.जांभूळ येथील कृषी सहाय्यक श्रीमती शैला जाधव यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!