दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑगस्ट २०२२ । फलटण । फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सनी अहिवळे यांच्या पुढाकाराने मंगळवार पेठेत म्हणजेच प्रभाग क्र. २ व ३ मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
मंगळवार पेठेतील विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी नगरसेवक संजय अहिवळे, सौ. वैषाली अहिवळे, किशोर नाईक निंबाळकर, युवा नेते राहुल निंबाळकर, माजी उपप्राचार्य सुधीर अहिवळे (सर), आझाद समाज पार्टीचे सनी काकडे, हरिष काकडे, रोहित माने, प्रशांत अहिवळे, लक्ष्मण काकडे, निलेश मोरे, ठेकेदार हेमंत काकडे, अक्षय अहिवळे, विशाल गुंजाळ, मुकुल अहिवळे, तेजस भोसले, रवी मोरे, आदित्य साबळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
मंगळवार पेठेतील धम्मयान चौक ते नवल टेलर, लक्षाई पॅाईट , सोनिया मित्र मंडळ ते जुनी चावडी, माने दुकान ते स्टेट बॅंक ते सचिन अहिवळे घर ते पुणे पंढरपुर रोड, आईस फॅक्टरी ते भगवान सॅा मिल हे सर्व सिमेंटचे रस्ते झाले असुन बंदिस्त गटारे तसेच भीमनगर परिसर, खंडेबा मंदिर परिसर, पंचशील चौक परिसर, चावडी परिसर, राजु अहिवळे परिसर, लष्कर वाडा परिसर यांच्यासह विवध विकास कामे चालू आहेत.