रक्षबंधनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत गृहराज्य मंत्री ना. शंभुराज देसाई यांनी बाजारपेठेची केली पाहणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 2 : जिल्ह्यात शिथिल केलेले लॉकडाऊन आणि रक्षबंधनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत होत असलेल्या गर्दीच्या अनुषंगाने रविवारी गृहराज्य मंत्री ना. शंभुराज देसाई यांनी सायंकाळी अचानक सातारा बाजारपेठेची पाहणी केली. यावेळी त्यांनी बाजारपेठेतील व्यवसायिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या.

सातारा येथे सायंकाळी ना. शंभुराज देसाई यांनी अचानक लवाजम्यासह येवून शहरातील बाजारपेठेला भेट दिली. मोती चौक आणि खालचा रस्ता याठिकाणी असलेल्या बाजारपेठेत आल्यानंतर त्यांनी व्यापार्‍यांशीही संवाद साधला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रक्षा बंधनला किती व्यवसायात घट झाली, पोलिसांकडून तसेच इतरांकडून काही अडचणी येतात, अशी विचारपूस त्यांनी केली. तसेच बाजारपेठेत रक्षा बंधन आणि शिथील केलेले लॉकडाऊन यामुळे बाजारपेठेत किती गर्दी होवू शकते, याचीही चाचपणी केली.

याप्रसंगी ना. शंभुराज देसाई म्हणाले की, लॉकडाऊन शिथील केल्यानंतर शहरात किती गर्दी होते, याची अचानक पाहणी केली आहे. उद्या रक्षा बंधन आहे. त्यामुळे महिलांची गर्दी दिसत आहे. मी राखी विक्रेते, फुलवाले, मिठाई विक्रेते, आदी व्यवसायिकांशी मी बोललो. तो गेल्या वर्षीपेक्षा खूपच कमी आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अर्थचक्र मंदगतीने सुरू असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. लॉकडाऊन उशिरा उठल्यामुळे त्यांना राखीचा स्टॉल मांडायला दोनच दिवस मिळाले आहेत. यामुळे व्यवसाय अत्यंत कमी झाला आहे. उद्याच राखी बंधन असल्यामुळे महिलांची गर्दी झाली आहे. मात्र, हळूहळू गाडा रुळावर  येणार आहे. महसूल, पोलीस प्रशासन चांगले नियोजन करत आहे. नागरिकांनीही गर्दीमध्ये सोशल डिस्टन्स पाळावे, असे आवाहन शेवटी ना. शंभुराज देसाई यांनी केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!