
स्थैर्य, नवी दिल्ली, 14 : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती, एम. वेंकैया नायडू यांनी जनतेला शुभेच्छा संदेश दिला आहे.
संदेशाचा खालील याप्रमाणे
आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय सोहळ्यानिमित्त मी आपल्या देशातील नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्यांचे अभिष्टचिंतन करतो.
आज आपण आपल्या देशाचा 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याच्या सुरक्षिततेसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर स्वातंत्र्य सैनिकांप्रति मी आदरांजली अर्पण करतो. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीरांचे स्मरण आपण कृतज्ञतेने केले पाहिजे.
या देशभक्तांच्या स्वप्नातील महत्वाकांक्षी भारताची निर्मिती करून आपण त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहू शकतो. जिथे अब्जावधी स्वप्ने पाहिली जातात आणि ती साकारही होतात असे संयुक्त, मजबूत, समृद्ध, सर्वसमावेशक आणि शांततापूर्ण राष्ट्र बनवण्याची आपली बांधिलकी या स्वातंत्र्यदिनी आपण नव्याने निभावू या.
हा स्वातंत्र्यदिन आपल्या देशात समरसता, सुसंवाद आणि समृद्धी आणो.