महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी राज्यपालांनी चैत्यभूमी येथे केले अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । मुंबई । डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते  मुंबई महापालिकेने  ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महत्त्वाची स्थळे’  या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच  ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र’ आणि ‘भारतीय संविधान’ हे पुस्तक मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आले.या कार्यक्रमाचे निवेदन नागसेन कांबळे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!