दैनिक स्थैर्य । दि. ०६ नोव्हेंबर २०२२ । सोलापूर । सोलापूरचे भूषण, ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक, निसर्गप्रेमी, लेखक आरण्यऋषी मारुती भुजंगराव चिट्टमपल्ली यांचा जन्म ५ नोव्हेंबरचा आणि भारतातील आद्य पक्षी शास्त्रज्ञ, ख्यातकीर्त पक्षी तज्ञ सलिम अली यांचा जन्म १२ नोव्हेंबरचा, या दोन महान पर्यावरणवाद्यांच्या जन्मदिवसाचे योग साधून ५ ते १२ नोव्हेंबर हा सप्ताह संकल्प सप्ताह म्हणून पर्यावरण प्रेमी विविध उपक्रम राबवितात. त्याचाच एक भाग म्हणून आदर्श जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचे प्रवर्तक सल्लागार आरण्यऋषी चिट्टमपल्ली यांच्या ९१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने अभिष्टचिंतन कार्यक्रम तथा जेष्ठांच्या सभासद नोंदणी मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या दरम्यान पर्यावरण जागृतीसाठी विशेष प्रयत्न करण्याचा संकल्पही करण्यात आला.
सत्कार मूर्तींना पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राजू हिबारे, दशरथ वडतिले आणि संजय जोगीपेटकर यांनी समयोचित संबोधन केले. सदर प्रसंगी कल्याणराव आळंद, सिद्रामप्पा गोविंदे, अंकुश माने, हनुमंतू गजेली, शिवाजी क्षीरसागर, सिद्धेश्वर श्रीगादी, संगन्ना खजुरगी, विश्वनाथ काळे, सुभाष आमले, श्रीनिवास चिट्टमपल्ली, सुर्यकांत गोडाळे, नागेश कन्ना, रमेश नंदूर, त्रंबक जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.