महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वर्धापन दिनी यशवंतराव चव्हाण केंद्रात उद्या कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२५ जानेवारी २०२२ । मुंबई । महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या स्थापनेस 29 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रातील ‘रंगस्वर सभागृहात’ वर्धापनदिनाचा कार्यक्रम मंगळवार, दि 25 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा. होणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ज्योती ठाकरे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. श्रीमती प्रियांका सावंत, श्रीमती निर्मला सामंत – प्रभावळकर, श्रीमती विजया रहाटकर,श्रीमती सुशिबेन शाह या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहेत. तसेच चंद्रा अय्यंगार, अ.ना. त्रिपाठी, आस्था लूथरा, श्रद्धा जोशी, या महिला आयोगाच्या माजी सदस्य सचिव देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात राज्यभरातील महिलांसाठी टोल फ्री क्रमांकाचे अनावरण  करण्यात येणार आहे. तसेच महिला आयोगाने तयार केलेल्या कॅलेंडर व डायरीचे देखील अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.

सदर कार्यक्रम कोरोनाचे सर्व निर्बंध लक्षात घेऊन 45 लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. कोविड नियमांमुळे प्रवेश फक्त निमंत्रितांनाच आहे. कार्यक्रम लाईव्ह   https://www.facebook.com/Maharashtra-state-Commission-For-Women-महाराष्ट्र-राज्य-महिला-आयोग-101703202320849/  या लिंकवर पाहता येईल.


Back to top button
Don`t copy text!