दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२३ । मुंबई । वंचित बहुजन आघाडी वार्ड क्र. २०० चे अध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडी, संपर्क कार्यालय याठिकाणी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर प्रसंगी तालुका अध्यक्ष रोहन पवार, जिल्हा उपाध्यक्ष खरवसकर, संघटक राजेश तांबे, दक्षिण मध्य मुंबईचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस कसबे, तालुका सदस्य अनंत मोहिते, नायगाव विभाग गटप्रमुख संदेश खैरे, शिवडी विभाग गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास गमरे, सामाजिक कार्यकर्ते लोखंडे, चंद्रकांत गायकवाड, संजय कदम, महिला अध्यक्ष दामिनी तांबे वार्ड अध्यक्ष लक्ष्मण कांबळे तसेच वार्डातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवराम हरळकर यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला, सदर प्रसंगी त्यांचं व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले तद्नंतर तालुक्यातील वार्ड पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आलं.
सदर प्रसंगी बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नायगाव शिवडी विभागातील वंचितचे जेष्ठ नेते आणि शिवडी विभागाचे गट क्र. १३ चे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास गमरे, नायगाव विभागचे गट क्र. १४चे गटप्रमुख संदेश खैरे, जिल्हा सचिव कसबे, जिल्हाध्यक्ष सुनील जाधव व सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत आदी मान्यवरांनी शिवरायांच्या जयंती संदर्भात मौलिक अस मार्गदर्शन केले. तसेच शिवजयंती बाबासाहेबांच्या जयंती सोबत साजरी करावी असा संदेश उपस्थित कार्यकर्त्यांनी दिला.
शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार व अठरा पगड जातीच्या सर्व लोकांना एकत्र घेऊन रयतेच राज्य निर्माण केलं त्याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सामील होत आहे व त्या सर्वांना पुढे नेण्याचं व न्याय, हक्क मिळवून देण्याच काम मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीद्वारे करण्यात येत आहे.
सरतेशेवटी जिल्हाध्यक्ष सुनील जाधव यांनी आपल्या भाषणात सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.