स्थैर्य, फलटण, दि.26 : कोरोना व्हायरस मुळे बजावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात गोर गरीब, बेघर, गरजू तसेच हातावर पोट असणार्यांच्या हाताला काम नाही, त्यामुळे लोकांना पोटाला पोटभर जेवण मिळावे या उदात्त हेतूने विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (राजे गट) आणि शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळ (मंडई गणपती) यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 23 मे 2020 पासून अखंडितपणे अन्नदान मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी या वेळी केले.
अन्नदान वाटप शुभारंभ माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे (आबा) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी शिवाजीराव घोरपडे (गजेंद्रगडकर), राहुल निंबाळकर (भैया) यांच्यासह फलटण आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, बंधू भगिनी तसेच मित्र मंडळी उपस्थित होते.