
दैनिक स्थैर्य । 15 जुलै 2025 । फलटण । अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या फलटण केंद्राच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव व शिष्यवृत्ती समारंभाचे आयोजन गुरुवार, दि.24 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नवलबाई मंगल कार्यालय मारवाडपेठ फलटण येथे आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षी संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे आयोजन येते. त्यानुसार यावर्षी इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या सभासदांनी गुणपत्रिकेची सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच पदवी, पदविका, पोस्ट ग्रॅज्युएशन इत्यादी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विषय सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इयत्ता दहावी संस्कृत इंग्रजी गणित तसेच बारावी मध्ये गणित व इंग्रजी विषयातील सर्वाधिक गुण प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांना रोग पारितोषिक देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर इयत्ता बारावी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी पात्र उमेदवारास फलटण केंद्रातर्फे आर्थिक मदत केली जाते त्या संदर्भात सभासदांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर सादर करावा गुणपत्रिका व अर्ज भरून देण्याची अंतिम तारीख 19 जुलै आहे.
यावर्षी इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या सभासदांनी गुणपत्रिकेवर आपला मोबाईल नंबर नमूद केलेली प्रत संस्थेच्या कार्यालयात जमा करून नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी कार्यवाहक अनिरुद्ध रानडे, लक्ष्मीनगर फलटण मोबाईल 7083628297 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.