
दैनिक स्थैर्य । दि. २८ जानेवारी २०२३ । मुंबई । भारतीय बौद्ध महासभा, अंकुर बौद्ध विहार शाखा, नायगाव, मुंबई – १४ यांच्या वतीने ७३ वा प्रजासत्ताक दिन मा. बौद्धाचार्य संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ज्योतीताई तांबे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी बौद्धाचार्य जगदीश कांबळे, बौद्धाचार्य महेंद्र पवार, संस्कार समिती सचिव सायलीताई ताम्हणेकर, महिला मंडळ सचिव मीनाक्षीताई लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान गायकवाड, संघटक सिद्धार्थ धसके, संघटक अविका तांबे, यत्वेश तांबे, अनन्या तांबे आदींनी उपस्थित राहून शाखेच्या अध्यक्षा ज्योतीताई तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजास मानवंदना दिली.
सदर प्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांस “भारतीय संविधान व प्रजासत्ताक दिन” या विषयावर मार्गदर्शन करून दोघांचेही महत्व पटवून दिले, भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र असून प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असलेल राष्ट्र, अशी प्रजेची सत्ता २ वर्षे, ११ महिने व १८ दिवस अथक परिश्रम घेऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरिकास मिळवून दिली त्यामुळे हा देश त्यांचा कायम ऋणी राहील असे प्रतिपादन मान्यवरांनी आपल्या भाषणातून केले.
सरतेशेवटी संतोष जाधव यांनी सर्वांचे आभार मानले व सामूहिक राष्ट्रगीत गायन करून कार्यक्रमाची सांगता केली.