
दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२४ | फलटण |
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष फलटण तालुका यांच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘भगवा सप्ताह’च्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध कार्यक्रमांचे आयोजन फलटण तालुक्यामध्ये केले आहे.
यामध्ये प्रामुख्याने शिवसेना सदस्य नोंदणी, घर तेथे शिवसैनिक, गाव तेथे शाखा, नवीन मतदारांची नोंदणी तसेच बूथप्रमुख, गटप्रमुख, बीएलए पदाधिकारी यांच्या नेमणुका या कार्यक्रमांतर्गत करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष फलटण शहर संघटक श्री. अक्षय विलास तावरे, मलटण शाखाप्रमुख श्री. मंगेश खंदारे, उपशाखाप्रमुख श्री. आशिष कापसे यांच्या माध्यमातून मलटण या ठिकाणी शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
हा कार्यक्रम सातारा जिल्हाप्रमुख श्री. संजय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच जिल्हा संघटिका सौ. कल्पनाताई गिड्डे, फलटण तालुकाप्रमुख श्री. विकास नाळे, उपजिल्हा संघटक श्री. विश्वास चव्हाण, युवासेना उपजिल्हा प्रमुख श्री. ऋषिकेश शिंदे, उपजिल्हा संघटिका सौ. सुशीलाताई जाधव, फलटण तालुका संघटक श्री. नंदकुमार काकडे, उपतालुका संघटक श्री. भारत लोहाना, फलटण शहर संघटिका श्रीमती लता विलास तावरे तसेच इतर शिवसैनिक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.