उद्या खा. शरद पवारांचे फलटणमध्ये जंगी स्वागत : सुभाष शिंदे; शरद पवारांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 24 ऑगस्ट 2023 | फलटण | उद्या फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने राष्ट्रवादीचे संस्थापक खासदार शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उद्या दहिवडी येथे आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार शरद पवार हे फलटणवरून मार्गस्थ होणार आहे. उद्या सकाळी 8 वाजता फलटण शहरातील नाना पाटील चौक येथे खासदार शरद पवार यांचा जंगी असे स्वागत असणार आहे; अशी माहिती राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांनी दिली.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांच्या फलटण येथील “जिद्द” येथील आयोजित पत्रकार परिषदेत सुभाष शिंदे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ निकम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख प्रदीप झणझणे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अमीर शेख यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

फलटण शहर व तालुक्यासाठी खासदार शरद पवार यांनी मोठे असे भरीव कामकाज केले आहे. आज आपण जो फलटण तालुका बघत आहोत त्यामध्ये खासदार शरद पवार यांचेच मोठे हात आहेत. फलटण तालुक्यात झालेल्या प्रत्येक विकासकामे मग त्यामध्ये धोम – बलकवडी प्रकल्प, फलटण रेल्वे, शहर व तालुक्यातील विविध विकासकामे ही फक्त आणि फक्त खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली व आशीर्वाद असल्यानेच झाले असल्याचे मत सुद्धा जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

फलटणला एक सुसंस्कृत अशी परंपरा आहे. याला कलंक लावण्याचे काम हे काही जण मुद्दामून करत आहेत. आगामी काळामध्ये फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनता ही कधीही हे मान्य करणार नाही. दमदाटीला उत्तर हे जनताच मतपेटीतून देईल.

– सुभाष शिंदे,

जेष्ठ नेते, राष्ट्रवादी.

माजी केंद्रीय कृषी मंत्री व राज्यसभा खासदार शरद पवार हे जाहीर कार्यक्रमच्या निमित्ताने दहिवडी येथे जाणार आहेत. त्यावेळी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीर सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. खासदार शरद पवार हे राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर प्रथमच फलटण येथे येत आहेत. विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार शरद पवार यांच्यासोबत फारकत घेत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासोबत गेल्याने उद्या नक्की खासदार शरद पवार नक्की कोणती भूमिका जाहीर करणार याकडे आता तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

खासदार शरद पवार यांच्या होत असलेल्या फलटणमध्ये स्वागतामुळे फक्त फलटण तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्याचे लक्ष लागून राहिले आहे. उद्या खासदार शरद पवार हे नक्की फलटणमध्ये येवून काय बोलणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!