दैनिक स्थैर्य । दि. १९ डिसेंबर २०२२ । सातारा । सातारा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यातील एक भाग म्हणून येत्या बुधवार दि २२ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता सातारा येथील आयुर्वेदातील मार्गदर्शक पुनम चौगुले यांचे आयुर्वेद औषधांचा योग्य पद्धतीने वापर कसा करावा या विषयावर मार्गदर्शनपर भाषण आयोजित केले आहे अशी माहिती कार्यवाह विजय मांडके व खजिनदार मदनलाल देवी यांनी दिली आहे. ज्येष्ठ नागरिक संघ सातारच्या राजवाड्याजवळील श्री छ प्रतापसिंह महाराज (थोरले) उद्यानातील सभागृहात बुधवार दि २१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी चार वाजता हे मार्गदर्शनपर भाषण होणार आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष श्रीमती वैदेही देव यांच्या अध्यक्षतेखाली हे भाषण होणार आहे. रासायनिक खतांचा वापर केलेली अन्नधान्य , तृणधान्य खाल्ल्याने शरीरावर अनिष्ट परिणाम होतो त्यामुळे रासायनिक खतांचा वापर न केलेली अन्नधान्य खाण्यासाठी वापरावीत ती आरोग्यासाठी चांगली असतात. तसेच आयुर्वेदिक औषधे ही उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त असतात. यासंदर्भात पुनम चौगुले आपले विचार मांडणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जेष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्ष श्रीमती ज्योती मोहिते व भिकाजीराव सूर्यवंशी यांनी केले आहे.