जाविदभाई तांबोळी यांच्या कुटुंबीयांतर्फे रमझान ईद निमित्त मईददीची रक्कम प्रांताधिकार्‍यांकडे सुपुर्त


स्थैर्य, फलटण, दि. 26 : येथील मोनिता ग्रुपचे पार्टनर व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर जाविदभाई तांबोळी यांनी रमजान ईद साजरी करताना एक सामाजिक बांधीलकी जपत एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. तांबोळी कुटुंबायांनी रमझान ईद निमित्त मईददीची रक्कम रुपये 11 हजार फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्याकडे सुपुर्त केले आहेत. 

रमजान ईद निमित्त घरातील सर्व मोठी माणसं लहान मूलांना भेट म्हणुन रक्कम देत असतात त्या रकमेस मईददी असे म्हणतात. जाविदभाई तांबळी यांच्या परिवारातील सर्व लहान मुला-मुलींनी स्वतःच्या इच्छेनुसार ती ईद्दीची सर्व रक्कम कोरोना साठी मदत म्हणून सुपूर्त केली आहे. याबाबत तांबोळी कुंटुंबीयांचे सर्व क्षेत्रातुन अभिनंदन केले जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!