दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । बौध्दजन पंचायत समिती विलेपार्ले गट क्र. २४, शाखा क्रमांक १६२ च्या वतीने ९ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ७:०० वाजता आश्विन पौर्णिमा निमित्त सालाबादप्रमाणे वर्षावास सांगता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वंदनीय महाथेरो भदंत शांतीरत्न यांच्या मार्गदर्शनाखाली प्रज्ञा शील महिला मंडळ, जेतवन सांस्कृतिक केंद्र येथे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १६२ च्या वतीने अत्यंत सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला, योगायोगाने जेतवन सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष आयु. संजय रामचंद्र जाधव यांचा वाढदिवस असल्याने तो देखील मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाथेरो भदंत शांतीरत्न यांनी उपस्थितांस अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले व उपस्थित बौध्द उपासक उपासिका यांना आवाहन केले की कान्हेरी गुंफा येथे १८ डिसेंबर रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे तरी मोठ्या संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावे, तसेच कामगार नेते रमेश मा. जाधव, अध्यक्ष जनसंपर्क व प्रसिद्धी समिती बौद्धजन पंचायत समिती यांनी आपले मत मांडताना “धार्मिक प्रश्नच नव्हे तर विद्यार्थी, युवा, महिला, कामगार या सर्वांचे मंगल करायचे असेल तर एकमेकावर टीका टिपणी करण्यात आपला अमूल्य वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून मुंबईतला आदर्श गट बनवण्यासाठी आपण एकजुटीने काम करूया” असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १६२ चे अध्यक्ष यशवंत पांडुरंग धोत्रे यांनी केले, तर उपाध्यक्ष सिद्धार्थ बाळू जाधव, चिटणीस सिद्धार्थ शिवराम मोहिते, दुय्यम चिटणीस शशिकांत यशवंत सुर्वे, खजिनदार विनोद शांताराम मोहिते यांनी हा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी अथक प्रयत्न केले, सदर कार्यक्रमास प्रज्ञा शील महिला मंडळच्या अध्यक्षा सुशीला लक्ष्मण येलवे, उपाध्यक्ष अश्विनी अशोक जाधव, चिटणीस श्रद्धा रवींद्र पवार, दुय्यम चिटणीस कोमल अजय गमरे, खजिनदार अक्षता संतोष धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थिती व मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती, तसेच जेतवन सांस्कृतिक केंद्रचे अध्यक्ष संजय रामचंद्र जाधव, उपाध्यक्ष महेंद्र लक्ष्मण येलवे, चिटणीस विनोद शांताराम मोहिते, दुय्यम चिटणीस सुमित सुरेश तांबे, खजिनदार आशिष सहादेव पवार या सर्वांच्या प्रमुख उपस्थिती होत्या, सर्वांनी मिळून आश्विन पौर्णिमा उत्साहात साजरी केली, सदर कार्यक्रमाच्या वेळी खिरदान करुन व वर्षावास काळात झालेल्या विचारांच्या देवाण-घेवाण संपूर्ण बौध्द अनुयायी पर्यंत पोचवण्याची जबाबदारी सर्वांनी घेऊन या कार्यक्रमाची सांगता केली.