औंध ग्रामपंचायत व आपुलकी वाँटसअप ग्रुपच्या वतीने 32कोरोनापिढीत रुग्णांना मिळाला मदतीचा हात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, औंध, दि. १३: औंध ग्रामपंचायत  व आपुलकी वाँटसअप ग्रुपच्या सदस्यांच्या वतीने येथील आश्रमशाळेमध्ये ठेवलेल्या  32कोरोना रुग्णांना माणूसकीच्या भावनेतून मदत करण्यात आली आहे. यावेळी यासर्व रुग्णांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले तसेच याठिकाणी ठेवलेल्या सर्व रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

वेळोवेळी त्याठिकाणी जाऊन औंध ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच, सर्व सदस्यांनी वेळोवेळी या रुग्णांची भेट घेऊन यासर्वाना मोठा आधार दिला तसेच त्यांच्या सर्व अडचणी समजावून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न केले .

औंध ग्रामपंचायत व आपुलकी वाँटसअप ग्रुपवरील सदस्यांनी जोपासलेल्या सामाजिक बांधीलकीचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक सदस्यांनी या रुग्णांना मदत व्हावी म्हणून रोख रक्कम, वस्तू,औषध,धान्य स्वरूपात मदत केली आहे त्याचबरोबर नियमित नाष्टा, जेवण याचीही व्यवस्था ग्रामपंचायतीचे वतीने करण्यात आली आहे.

यापुढील काळात ही समाजातील गरजू रुग्णांना औंध ग्रामपंचायतीचे मार्फत आवश्यक ती मदत केली जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे वतीने देण्यात आली आहे.

याकामी समाजाच्या विविध स्तरातील मान्यवर, घटकांनी जी मदत केली त्याबद्दल औंधचे सरपंच ,उपसरपंच यांनी  सर्वाचे आभार मानले असून या मदतीबरोबरच औंध ग्रामपंचायतीने कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी कंबर कसली आहे.
मागील काही दिवसांपासून औंध गावात औंध ग्रामपंचायतीचे सदस्य, कर्मचारी यांच्या वतीने स्वच्छता अभियान, जनजागृती अभियान राबविले जात असून सर्व प्रभागांमध्ये औषध फवारणी ही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचाही कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठा आधार
औंध  ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांची धडपड पाहुन औंध संस्थानच्या अधिपती श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी ही कोरोनाग्रस्त रुग्णांना  जीवनावश्यक साहित्य व औषधांच्या स्वरूपात  मोठी  मदत केली असून संबंधित रुग्णांची व गावात वाढणारा कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा आपण सर्वोतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली आहे.
त्याचबरोबर औंध गावास  जास्तीत जास्त  आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्या  प्रयत्न करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!