दैनिक स्थैर्य । दि. १४ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । भारतीय बौद्ध महासभा- शाखा अंकुर बुद्ध विहार नायगाव दादर मुंबई यांच्या विद्यमाने मा. ज्योतीताई तांबे यांच्या अध्यक्षतेखाली त्यागमूर्ती महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माता रमाईच्या लेकी आपल्या आईच्या जयंतीनिमित्त नटून-थटून आल्या होत्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. मीनाक्षीताई लोखंडे यांनी केले तर कार्यक्रमास अनुमोदन मा. स्वातीताई पवार यांनी दिले. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षची धुरा मा. सायलीताई तामानेकर यांनी पार पाडली.
सदर प्रसंगी अनेक उपासिकांनी उपासकांनी माता रमाईवर गीत सादर केले तर मा.निशाताई जाधव यांनी रमाई जीवनावर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाची रूपरेषा व संपूर्ण जबाबदारी मा.आयु. संतोष जाधव ( बौद्धाचार्य ) मा. जगदीश कांबळे (बौद्धाचार्य ) यांनी सुयोग्यरित्या पार पाडली. अंकुर बुद्धविहाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे अंकुर बुद्ध विहाराला शेवटचा निरोप देत असताना अनेक उपासक-उपासिकांना अश्रू अनावर झाले. अनेकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सरतेशेवटी अध्यक्ष ज्योतीताई तांबे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.