
दैनिक स्थैर्य । दि. १० सप्टेंबर २०२२ । फलटण । नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (अंडर ग्रॅज्युएट) किंवा एनईईटी, पूर्वीची ऑल इंडिया प्री-मेडिकल टेस्ट, ही भारतातील सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये पदवीपूर्व वैद्यकीय, दंत आणि आयुष अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय प्री-मेडिकल प्रवेश परीक्षा आहे.यामध्ये पुढील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे व पालकांचे अभिनंदन करण्यासाठी आदर्श बहुजन शिक्षक संघाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या परीक्षेत आदित्य विजयकुमार नाळे, स्वानंद संजय नाळे, तनिष्का सुरेश नाळे, प्रतीक सतीश गावडे या विद्यार्थ्यांनी नीट 2022 परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवले. त्यांनी हे यश मिळवल्याबद्दल त्यांचा आदर्श बहुजन शिक्षक संघाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला आणि त्यांना प्रोत्साहित व प्रेरित केले व भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी आदर्श बहुजन शिक्षक संघाचे नेते लक्ष्मण गुंजवटे, आदर्श बहुजन शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष राजेश बोराटे तसेच सातारा जिल्हा अध्यक्ष गणपत बनसोडे, सातारा जिल्हा सरचिटणीस उत्तम चोरमले, सातारा जिल्हा कोषाध्यक्ष नितीन नाळे, फलटण तालुकाध्यक्ष जयवंत तांबे, व मारुती ढगे,फलटण तालुका सरचिटणीस राजेंद्र अहिवळे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष विश्वास अर्जुन, विजयकुमार नाळे व गजानन नाळे या पदाधिकाऱ्यांनी यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहित केले व त्यांच्या सर्व कुटुंबियांचे ही अभिनंदन यावेळी करण्यात आले.
या सत्कार समारंभ कार्यक्रमास तिरकवाडी गावचे उपसरपंच नानासो काळूखे डॉ.किरण कुमार नाळे, डॉ.सास्तुरकर,प्राथमिक शिक्षक बाळकृष्ण मोरे, आबासाहेब नाळे, सुरेश नाळे, सूर्यकांत शिंदे, विष्णू नाळे, संजय नाळे, उज्वला नाळे, वैशाली नाळे, सुषमा नाळे आणि गावडे मॅडम यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फलटण तालुका अध्यक्ष जयवंत तांबे सर यांनी केले आणि आभार सतीश गावडे सर यांनी मानले.