१५ ऑगस्ट रोजी लोकनेते कै. हिंदूरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑगस्ट २०२३ | फलटण |
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर असलेल्या फलटण शहरामध्ये सर्व सुविधांयुक्त असलेल्या लोकनेते कै. हिंदूरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवनच्या नूतन इमारतीचा स्वातंत्र्यदिनी, मंगळवार दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी लोकार्पण सोहळा पार पडत आहे. हा सोहळा सद्गुरू हरीबाबा मंदिरासमोर, मलटण, ता. फलटण येथे संपन्न होईल.

ह.भ.प. युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या कृपाशिर्वादाने होणारा हा लोकार्पण सोहळा माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होत आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वारकरी संघटना फलटण तालुक्याचे संस्थापक ह.भ.प. गणपतराव निकम असणार आहेत.

यावेळी फलटण शुगर साखरवाडीचे माजी अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील, फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समेशरदादा नाईक निंबाळकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयकुमार शिंदे, भाजपा फलटण तालुका महिला संघटना प्रमुख अ‍ॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सद्गुरू उद्योग समूहाचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, फलटण संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, माजी नगरसेवक नारायण बाबर, दत्तराज व्हटकर, विश्वासराव भोसले, डॉ. जे.टी. पोळ, डॉ. प्रवीण आगवणे, सचिन बेडके-सूर्यवंशी, अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले, फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर, डॉ. प्रसाद जोशी, बाळासाहेब भोसले-पाटील, बजरंग गावडे, राजाभाऊ नागटीळे, निलेश पवार, डॉ. राहुल घाडगे, डॉ. सचिन ढाणे, प्रशांत बावळे, बाळासाहेब घनवट, मोहनराव रणवरे, धनंजय पवार, डी. के. पवार, अभिजित नाईक निंबाळकर, विक्रम भोसले, रवींद्र बेडकिहाळ, सचिन यादव, अरविंद मेहता, सुजाता यादव, ज्ञानेश्वर सावंत, अशोकराव शिर्के, संजय घाडगे, नितीन जगताप, विश्वासराव धुमाळ, रमेश सोनावणे, एस. एम. घाडगे, तुकाराम कोकाटे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

लोकार्पण सोहळ्यादिवशी सकाळी ९.३० ते १०.३० वाजेदरम्यान सत्यनारायण महापूजा सौ. छायादेवी व ह.भ.प. केशवराव जाधव महाराज, सौ. अनुराधा व किशोर गोडसे यांच्या हस्ते संपन्न होईल. सकाळी १०.०० ते १०.३० दरम्यान वारकरी ध्वजपूजन सौ. गौरी व कुमारजी भट्टडसोा व सौ. वनिता व दौलतराव घनवटसोा यांच्या हस्ते होईल.

सकाळी १०.३० ते ११.३० वाजता सांप्रदायिक भजन व ११.३० ते १२.३० वाजता उद्घाटन व मान्यवरांची मनोगते होणार आहेत. दुपारी १.०० ते २.०० प्रसाद वाटप कार्यक्रम होईल.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने फलटण तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक अशोकराव जाधव, सौ. रश्मीताई नाईक निंबाळकर, सौ. मदलसा कुंभार, श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर, मीनाताई नेवसे, प्रा. सचिन अहिवळे, सौ. ज्योती खरात यांनी केले आहे.

कार्यक्रमासंबंधी अधिक माहितीसाठी मोबा. ९२७३१०६२०९ व ७६२०४०८००२ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!