दैनिक स्थैर्य । दि.०७ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यात 14 एप्रिल 2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत आहे. जयंतीच्या निमीत्ताने विविध कार्यक्रम, मिरवणुका आयोजित केल्या जाण्याची शक्यता आहे. या संबंधाने वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करणे, तसेच मिरवणुकीच्या मार्गासंबधाने व मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे, आणि ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे पालन व्हावे व लाऊड स्पीकरचा यासाठी, अजयकुमार बंन्सल, पोलीस अधिक्षक सातारा यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा आदेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 36 नुसार, कायदा व सुव्यवस्थेच्या बदोबस्त कामी नेमलेल्या सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक, सर्व सहा. पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस उप निरीक्षक यांच्यासह बंदोबस्तावरील अन्य सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दि. 14 एप्रिल 2022 रोजी त्या-त्या पोलीस ठाणे हद्दितील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून व मा.सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे यादृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.