श्री छत्रपती शाहू हायस्कूलच्या विज्ञान शाखेचा ओम विजय गोसावी आयआयटीमध्ये चमकला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२२ । बारामती । रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथील विज्ञान शाखेतील ओम विजय गोसावी या विद्यार्थ्यास इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आय आय टी ) धारवाड या ठिकाणी प्रवेश मिळाला आहे. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य माननीय श्री सदाशिव बापूजी सातव यांच्या मार्गदर्शनाखाली ओम विजय गोसावी याचा सत्कार घेण्यात आला. बारावी मध्ये ओम ला 86.83% मिळाले JEE ADVANCED मध्ये संपूर्ण भारतात त्याला 14,781 हा RANK मिळाला तर 3552 हा OBC RANK आहे MHT CET मध्ये त्याला 98.29% मिळाले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी )धारवाड येथे त्याला ELECTRICAL BRANCH मध्ये प्रवेश मिळाला आहे.

माननीय प्राचार्य श्री.बी. एन. पवार साहेब उपप्राचार्य श्री. पी. एन. तरंगे सर पर्यवेक्षक श्री. बी. ए .सुतार सर यांनी ओम विजय गोसावी व त्याच्या पालकांचा विद्यालयामार्फत सत्कार केला ओम विजय गोसावी ला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्राध्यापकांचे तसेच त्याच्या पालकांचेही विद्यालयामार्फत अभिनंदन करण्यात आले. ओमची चिकाटी, त्याची अभ्यासामध्ये एकाग्रता, त्याचा आत्मविश्वास यामुळेच तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला असे मत त्याच्या पालकांनी व्यक्त केले त्याचबरोबर त्याला मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालयातील सर्व शिक्षक वृंदांचे त्यांनी आभार मानले

ओमचे पालक आणि ओम यांनी स्वतः जी पुस्तके अभ्यासासाठी वापरली होती ती सर्व पुस्तके विद्यालयातील ग्रंथालयास देऊ केली. जेणेकरून गरीब गरजू विद्यार्थी या पुस्तकांचा वापर करतील .

विद्यालयाचे प्राचार्य श्री. बी. एन. पवार सर यांनी त्याचे कौतुक करत असताना म्हणाले श्रेय कष्टातूनच मिळते त्याला कोणताही पर्याय नसतो आणि मगच आपण आपलं ध्येय गाठू शकतो. ओम गोसावीला त्याच्या पुढील वाटचालीसाठी विद्यालयातील प्रत्येक घटकांकडून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि ओम विजय गोसावी हा श्री छत्रपती शाहू हायस्कूल चा विद्यार्थी आहे याचा आंम्हा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे असे मत माननीय प्राचार्य श्री. बी. एन. पवार साहेब यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!