दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२२ । मुंबई । ओकिनावा ऑटोटेक, देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी यावेळी नेरूळ, नवी मुंबई येथे आणखी एका अत्याधुनिक गॅलॅक्सी शोरूमचे उद्घाटन केले,
हे गॅलॅक्सी स्टोअर ग्राहकांचा टच अॅण्ड फीलसाठी उत्पादन पोर्टफोलिओ दाखवत दर्जात्मक लुक्ससह रिअल-टाइम ग्राहक अनुभव देते. या स्टोअर्समध्ये नवोन्मेष्कारी सुविधा आहेत, ज्यामधून ओकिनावाने सादर केलेले जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान दिसून येते.
गॅलॅक्सी स्टोअर्सचा नेक्स्ट-जनरेशन ऑटो विक्रीसाठी आदर्श स्थापित करण्याचा आणि इलेक्ट्रिक दुचाकींप्रती ग्राहक सहभाग वाढवण्याचा मनसुबा आहे. या एक्स्पेरिअन्स सेंटर्सची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, ते ग्राहक व ईव्ही प्रेमींना विशेष सीन्समागील दृश्य आणि उत्पादन प्रक्रियेच्या अंतर्गत कार्यप्रणालीचा अनुभव देतात. हा अद्वितीय सेटअप आहे, जेथे विक्री दुय्यम बनते. येथे ओकिनावा ग्राहकांना देणारा अनुभव महत्त्वाचा आहे.
ओकिनावा ऑटोटेकचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री. जीतेंदर शर्मा म्हणाले, ”आम्हाला महाराष्ट्रातील नेरूळ येथे आमच्या फ्युचरिस्टिक गॅलॅक्सी शोरूमच्या उद्घाटनाची घोषणा करताना आनंद होत आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष एक्स्पेरिअन्स सेंटर सुरू करण्यामागे ग्राहकांना ब्रॅण्ड म्हणून ओकिनावाच्या सर्वोत्तम सुविधेचा अद्वितीय अनुभव देण्याचा उद्देश आहे. आम्ही नेहमीच आमच्या स्टोअर्समधील उत्साह वैविध्यपूर्ण व सर्वसमावेशक राहण्याची, तसेच ग्राहक अनुभव मोठ्या प्रमाणात सुधारण्याची खात्री घेतो.”
गॅलॅक्सी स्टोअर्स ग्राहकांना स्टोअरमध्ये प्रदर्शित केलेल्या कट-सेक्शन स्कूटर्सद्वारे ही उत्कृष्ट कलाकृती बनवण्याच्या रचनेचा अनुभव देतात. ग्राहक बॅटरी, मोटर आणि चेसिस यांपसारख्या महत्त्वपूर्ण घटकांचे तपशीलवार परीक्षण करू शकतात. या अत्याधुनिक एक्स्पेरिअन्स सेंटर्सचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे कस्टमायझेशन झोन, जेथे ग्राहक त्यांच्या निवडलेल्या वाहनाची योग्य तपशिलांसह सुधारणा करू शकतात. भविष्यातील तंत्रज्ञान एक्स्पेरिअन्स सेंटर हे एक उत्साही, माहितीपूर्ण आणि परस्परसंवादी क्षेत्र आहे, जेथे ग्राहकांना ब्रॅण्डच्या स्थापनेपासून इथवरपर्यंतचा अनुभव मिळतो.