अबॅकस चॅम्पियन्स स्पर्धेत ओजस्वी गौंडचा प्रथम क्रमांक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० जानेवारी २०२५ | फलटण |
गुणवरे (ता. फलटण) गावचे श्री. संदेश प्रकाश गौंड यांची कन्या व प्रगतशील बागायतदार स्व. प्रकाश बाबासो गौंड यांची नात कु. ओजस्वी संदेश गौंड हिने पुणे येथे आयोजित केलेल्या अबॅकस चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन स्पर्धेत ‘नॅशनल अवॉर्ड’ मिळवला आहे. तिच्या या यशाने गुणवरे गावच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ओजस्वी ही अत्यंत तल्लक व हुशार बुद्धिमत्तेची असून ती गुणवरे गावातील ब्लूम इंग्लिश मिडियम स्कूलची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे संपूर्ण तालुक्यातून प्रचंड कौतुक होत आहे. ओजस्वी संदेश गौंड हिचे आजोबा प्रगतशील बागायतदार म्हणून पंचक्रोशीत नावाजले होते. त्यांच्याच वाटेवरती पुढे जात ओजस्वीचे वडील श्री. संदेश प्रकाश गौंड हे यशस्वी व प्रगतशील बागायतदार बनले आहेत. ओजस्वीला घरात चांगले बौद्धिक वातावरण असून त्यांच्या घराण्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व शासकीय हे वातावरण अगदी सर्वगुणसंपन्न आहे. त्यामुळे ओजस्वीने हे यश संपादन करून घराण्याची मान अभिमानाने उंचावली आहे. ओजस्वीचे चुलते श्री. निलेश प्रकाश गौंड हे मीरा-भाईंदर महानगरपालिका (मुंबई) येथे तहसीलदार पदावर कार्यरत आहेत.

ओजस्वीचे थोरले आजोबा तालुक्यातील प्रसिद्ध राजकारणी श्री. कांतीलाल बाबासो गौंड हे परिचित नाव असून दुसरे आजोबा श्री. रामदास बाबासो गौंड हे डायनॅमिक्स डेअरी गुणवरेचे संचालक आहेत. तसेच ते गुणवरे ग्रामपंचायतीच्या राजकारणात सक्रिय आहेत. ओजस्वीचे एक चुलते इस्त्राईलमध्ये डेअरी कोर्स पूर्ण करून गावात यशस्वी दूध उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. ओजस्वीच्या आजोबांचे भाचेजावई महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे आहेत.अशा गुणसंपन्न घरातून आलेल्या कु. ओजस्वी संदेश गौंड हिने अबॅकस स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

या यशाबद्दल ओजस्वीचे ब्लूम इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री. ईश्वर गावडे, व्यवस्थापकीय संचालिका व अध्यक्षा सौ. साधना संभाजी गावडे, स्कूलचे मार्गदर्शक श्री. संभाजी गावडे (आरटीओ अकलूज), स्कूलचे प्रिन्सिपल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, जे. पी. गावडे (निबंधक, सहकारी संस्था फलटण), दिपक गौंड (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण), ज्ञानेश्वर गौंड (माजी सभापती, पंचायत समिती, फलटण), अमोल आढाव (पोलीस पाटील, गुणवरे), शिवाजी लंगुटे-गावडे (संस्थापक चेअरमन, भैरवनाथ सहकारी सेवा सोसायटी गुणवरे), डॉ. धनाजी आटोळे (संचालक, स्वराज पतसंस्था गुणवरे), युवराज सांगळे, शिवलाल गावडे (तंटामुक्ती समिती अध्यक्ष), आनंदराव आढाव (माजी प्राचार्य, कै. संजय गांधी विद्यालय गुणवरे), श्रीमती सविता भारत आढाव (सरपंच, ग्रामपंचायत गुणवरे), प्रा. रमेश आढाव (ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार), अरुण गौंड, अन्सारभाई शेख व गावातील विविध सामाजिक सेवाभावी संस्था, शशिकांत आढाव पत्रकार व माजी उपसरपंच गुणवरे, राजू बनसोडे, तुकाराम गौंड (माजी पोलीस उपायुक्त), गावातील गणेशोत्सव मंडळे, निलेश गौंड मित्र परिवार गुणवरे आदींनी तिचे कौतुक केले आहे.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)


Back to top button
Don`t copy text!