ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकांची ऑफलाईन पध्दतीने नोंदणी 


स्थैर्य, सातारा, दि. 19 डिसेंबर : सातारा तालुक्यातील ज्या शेतकर्‍यांना काही कारणास्तव खरीप हंगाम 2025 मध्ये आपले 7/12 वरती पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतकर्‍यांनी संबधीत गांवचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे दिनांक 24 डिसेंबर 2025 पर्यंत पिकांची नोंद करणेकरिता अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसिलदार समीर यादव यांनी केले आहे.

राज्यात खरीप हंगाम, 2025 मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करणेबाबत दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयान्वये मंडल अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समीती गठीत केलेली असून सदर समीतीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व सहायक कृषी अधिकारी हे सदस्य असतील. सदर समितीने करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांनी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!