भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांनी घेतली उद्योगमंत्र्यांची भेट


दैनिक स्थैर्य । दि. ११ मे २०२२ । मुंबई । केंद्र शासनाच्या भारतीय परराष्ट्र सेवेत (२०२१ तुकडी) नव्याने दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेऊन उद्योग विभागाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली.

भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झालेले रजत उभयकर, शायशा ओरके, श्रीमती सिमरन हे अधिकारी राज्य शासनाकडे तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक स्थिती, गुंतवणूक आदींची माहिती जाणून घेतली.

देश-विदेशातील अनेक कंपन्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. उद्योग वाढीसाठी राज्य शासनाने विविध योजना आणि धोरणे आखली आहेत. त्याचे सकारात्मक परिमाण दिसत आहेत. कोविड काळात यामुळे तीन लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. विदेशी गुंतवणुकदारांना मदत करण्यासाठी कंट्री डेस्क तयार करण्यात आला आहे, अशी माहिती उद्योग मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिली.


Back to top button
Don`t copy text!