दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | सातारा | दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक अशोक शिर्के, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यामध्ये ग्रामसभा, ऑनलाईन चर्चासत्र, भ्रष्टाचार विरोधी जनजागृती, रांगोळी स्पर्धेचे आयोजन, खाजगी-प्रवासी वाहतुक करणाऱ्या चारचाकी व तीनचाकी वाहनांची रॅली असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे श्री. शिर्के यांनी यावेळी सांगितले.