प्रभाग ५: राजे गटाचे उमेदवार विजयकुमार लोंढे-पाटील यांच्या अर्जावर भाजपची हरकत; सुनावणीकडे लक्ष


स्थैर्य, फलटण, दि. १८ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज सुरू झाली असतानाच, प्रभाग क्रमांक पाचमधील लढतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या प्रभागातील राजे गटाचे अर्थात शिवसेनेचे उमेदवार विजयकुमार लोंढे-पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर भारतीय जनता पार्टीच्या (खासदार गट) वतीने हरकत नोंदवण्यात आली आहे.

आज छाननी प्रक्रियेदरम्यान भाजपने ही हरकत घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या हरकतीची सुनावणी थोड्याच वेळात होणार असून, त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी त्यावर निकाल देणार आहेत.

विजयकुमार लोंढे-पाटील हे राजे गटाचे प्रभाग ५ मधील अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने घेतलेली हरकत नेमकी कोणत्या कारणावरून नोंदवण्यात आली आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. अर्जातील त्रुटी, कागदपत्रांची पूर्तता किंवा इतर तांत्रिक मुद्यांवरून ही हरकत घेतली गेली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

या सुनावणीच्या निकालावर प्रभाग क्रमांक ५ मधील लढतीचे भवितव्य अवलंबून आहे. जर ही हरकत मान्य झाली, तर राजे गटाला मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे या सुनावणीकडे आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण फलटण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.


Back to top button
Don`t copy text!