ओ.बी.सी. राजकिय आरक्षण रद्द झाले याला राज्य सरकार जबाबदार; निवडणुका पुढे ढकलाव्यात : भा ज पा ची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२१ । सातारा । सातारा येथे पोवई नाक्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी राजकिय आरक्षण रद्द झाले याला राज्य सरकार जबाबदार असून आगामी निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी जोरदार मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे आज करण्यात आली.

सातारा येथे पोवई नाक्यावर भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रमजी पावसकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यानंतर महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आले.

निवेदनात म्हणले आहे की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणूका शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या जर या आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधवावर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. पण या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणून बुजून काढून घ्यायचे होते म्हणून त्यांनी कोर्टाला इम्पेरियल डेटादिला नाही व ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले. म्हणजेच या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून सुद्धा कुठलीही कार्यवाही केली नाही फक्त आणि फक्त ओबीसी समाजाला आशेवर ठेवून पद्धतशीरपणे निवडणुकीतून बाजूला केले म्हणून ह्या सरकारचा ओबीसी समाजाच्या वतीने व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करतो. यापुढे ओबीसी समाजाने शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारला निवडणुकीतून हद्दपार करण्यासाठी एकजुटीने लढण्याची व ह्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे.
तसेच जोपर्येंत राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू होत नाही तो पर्येंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक घेण्यात येऊ नये, भारतीय जनता पार्टी तर्फे ओ बी सी च्या जागेवर ओ बी सी चाच उमेदवार दिला जाणार आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. सुवर्णाताई पाटील, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष ऍड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे जिल्हा चिटणीस सुनील जाधव, महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरभी चव्हाण, अनुसूचितजाति मोर्चा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे, व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष डाॅ.सचिन साळुंखे, सिने कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, प्रज्ञा आघाडी जिल्हाध्यक्ष फत्तेसिंहपाटणकर भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रिया नाईक ,बीसी मोर्चा युवती जिल्हाध्यक्ष वनिता पवार ,मोर्चा ओबीसी मोर्चा युवक युवक जिल्हाध्यक्ष महेंद्र कदम सातारा ,शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, सातारा शहर तालुका सरचिटणीस गणेश पालखे,सातारा शहर उपाध्यक्ष चंदन घोडके ,प्रशांत जोशी, तालुका उपाध्यक्ष विक्रम पवार ,सातारा शहर युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे, सातारा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सुजित साबळे ,सातारा शहर महिला मोर्चा अध्यक्ष रीना भणगे ,नगरसेवक धनंजय जांभळे ,नगरसेविका सिद्धी पवार ,नगरसेवक सुनील काळेकर, युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष किरण गोगावले, द्योगिक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल टंकसाळे, महिला मोर्चा सातारा सरचिटणीस अश्विनी हुबळीकर ,हेमांगी जोशी, माजी नगरसेवक किशोर पंडित ,ज्येष्ठ नागरिक नागरिक आघाडी अध्यक्ष प्रकाश शहाणे ,औद्योगिक आघाडी सातारा शहर अध्यक्ष रोहित साने ,महिला मोर्चा सातारा शहर उपाध्यक्ष मनिषा जाधव, युवा मोर्चाचे अमोल कांबळे ,विजय गाढवे, सुबोध चव्हाण , सुधीर काकडे सुनील फडतरे, रवींद्र लाहोटी, शालन माने सोनाली वाघमारे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!