दैनिक स्थैर्य । दि. ०८ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । कृषी परिसंस्थेशी संबंधित सर्व उपाययोजनांसाठीचे भारताचे अग्रगण्य अॅगटेक स्टार्टअप नेचर.फार्म ने केलेल्या घोषणेनुसार या स्टार्टअपचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म नर्चर.रिटेल (nurture.retail) ही ५०,००० रिटेलर्स आणि १००० हून अधिक उत्पादनांच्या साथीने भारताची सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने विकसित होणारी ऑनलाइऩ इनपुट बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. नर्चर.रिटेल हा उत्पादक, रिटेलर्स आणि डीलर्स यांच्यामधील डिजिटल संपर्काच्या शक्यता खुल्या करत अॅग-इनपुट बाजारपेठेमध्ये परिवर्तन घडवून आणत असलेला एक ऑनलाइन ई-कॉमर्स मंच आहे.
nurture.farm चे बिझनेस हेड आणि सीओओ ध्रुव सोहनी म्हणाले, “हा अॅग्री-इनपुट विभाग म्हणजे कृषी क्षेत्रासाठीचा एक महत्त्वाचा दुवा आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांना अन्नाचा दर्जा, अन्न सुरक्षितता आणि स्पर्धात्मक विक्रीमूल्य यांसंबंधीच्या चिंता दूर करता येतात. शेतक-यांना उत्पन्न वाढविण्यासाठी, खर्चात कपात करण्यासाठी आणि अधिक चांगले मूल्य प्राप्त करण्यासाठी अस्सल आणि नवीनतम शेतीसाहित्य मिळणे अत्यंत आवश्यक असते. नर्चर.रिटेल मध्ये आम्ही ५०,००० आणि सातत्याने वाढत असलेल्या अॅग्रो-रिटेलर्ससाठीचा भारताचा सर्वात मोठा आणि विश्वासार्ह ब्रॅण्ड विकसित केला आहे, ज्यांना आता उत्पादकांच्या थेट संपर्कात येणे शक्य होते व त्यामुळे शेतक-यांना रास्त किंमतीत अस्सल उत्पादने मिळू शकतात. “
नर्चर.रिटेल हे अॅप पंजाब, उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, ओडिशा, झारखंड, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अशा १३ राज्यांमध्ये कार्यरत आहे. नर्चर.रिटेल हा एक असा मंच आहे, जो शेतीमध्ये वापरल्या जाणा-या गोष्टींची किरकोळ विक्री करणारे रिटेलर्स आणि वितरकांना पेस्टीसाइड्स (किटकनाशक, तणनाशक, बुरशीनाशक), खते आणि इतर पोषक व जैविक उत्पादने, शेतीची अवजारे, बी-बियाणे आणि पशुखाद्य अशी उत्पादने थेट उत्पादकाकडून विकत घेण्याची मोकळीक देते. यूजर्सना पैसे नंतर भरण्यासाठीचा पे लेटरचा पर्याय मिळू शकतो किंवा अतिरिक्त सवलती मिळविण्यासाठी डिजिटल पेमेंट पद्धतीचा पर्याय निवडता येतो. सर्व उत्पादने रिटेलर्सना विनामूल्य घरपोच केली जातात.
नर्चर.रिटेल च्या बी२बी कृषी उत्पादन बाजारपेठेकडे उत्पादनांची अमर्याद सूची आणि एसडब्ल्यूएएल, यूपीएल, गोदरेज अॅग्रोव्हेट, यारा इंटरनॅशनल, सल्फर मिल्स, बेस्ट अॅग्रो लाइफ, नेपच्युन पम्प्स, आयपीएल बायोलॉजिकल, इगल सीड्स, रॅक्कोल्तो, स्प्रेवेल अॅग्रो, अॅग्रीओन, गोल्डकिंग यांसारख्या १२ हून अधिक उत्पादकांच्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे, ज्यामुळे उत्पादने शोधणे अत्यंत सुलभ आणि सोपे झाले आहे. दर महिन्याला १०० कोटी रुपये मूल्याइतक्या वस्तूंची विक्री करणा-या या मंचावर किरकोळ विक्रेत्यांना सर्वोत्तम किंमतींमध्ये मागण्या पूर्ण करण्यासाठी उत्पादनांना प्री-ऑर्डर करता येते.