दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । नर्चर.फार्म या भारतातील आघाडीच्या कृषीतंत्रज्ञान स्टार्ट-अपने भारतातील आघाडीची जनरल विमा कंपनी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीसोबत सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत स्टार्ट-अपच्या व्यासपीठावरील २.३ दशलक्ष शेतक-यांसाठी एचडीएफसी एर्गोचे विमा उपाय वाढवण्यासोबत विस्तारित करण्यात येतील.
नर्चर.फार्मचे सीटीओ श्री. प्रणव तिवारी म्हणाले, ‘’भारतात पीक विम्याचे कमी प्रमाण हे आपल्या शेतक-यांसाठी खूप दुःखाचे कारण आहे. त्यांना कीटक, हवामानातील बदल, किमतीतील अस्थिरता, दुष्काळ अशा सर्व प्रकारच्या जोखमींना तोंड द्यावे लागते. अशा जोखीमांविरोधात सुरक्षितता देणा-या उत्पादन ऑफरिंग्ज व विमा उपायांच्या अभावामुळे ते आर्थिकदृष्ट्या असुरक्षित होतात आणि त्यांचे शोषण केले जाते. एचडीएफसी एर्गोसोबत आमच्या सहयोगाचा शेतीच्या जीवन चक्रादरम्यान अकाली आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानांशी संबंधित शेतक-यांच्या त्रासाला दूर करण्याचा मनसुबा आहे. हा सहयोग आम्हाला भारतातील शेतकरी समुदायाला शाश्वतपूर्ण परिणाम देण्याच्या आणि शेतक-यांना स्थिर बनवण्याच्या आमच्या दृष्टिकोनाची पूर्तता करण्यामध्ये मदत करेल.’’
शेती चक्राच्या प्रत्येक टप्प्यावर शेतक-यांना विविध प्रकारच्या जोखमींचा सामना करावा लागतो. यापैकी काही जोखीम म्हणजे त्यांच्या पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम करणारे हवामानातील बदल, कामाच्या स्वरूपामुळे त्यांच्या वैयक्तिक आरोग्यास निर्माण होणारा धोका आणि वस्तूंच्या बाजारपेठेतील किंमतीतील चढउतार. ज्यामुळे शेतक-यांना उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानाचा सामना करावा लागतो. मोठे प्रीमियम आणि कागदपत्र व्यवहारांच्या त्रासामुळे बहुतांश शेतकरी विमा घेणे टाळतात. ही मोठी समस्या पाहता नर्चर.फार्मचे २०२२-२३ मध्ये जवळपास २ दशलक्ष शेतक-यांना विमा उपाय ऑफर करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच कंपनी शेतक-यांची स्थिरता वाढवण्याच्या उद्देशाने जोखीम कमी करण्याचे उपाय देण्यासाठी सतत नवनवीन उपक्रम राबवेल.
एचडीएफसी एर्गोचे अपॉईंटेड अॅक्चुअरी हितेन कोठारी म्हणाले, ‘’एचडीएफसी एर्गोमध्ये आम्ही आर्थिक सुरक्षितता देण्यासोबत शाश्वतपूर्ण कृषीला प्रोत्साहन देण्याकरिता ग्रामीण समुदायासाठी नाविन्यपूर्ण विमा उपाय आणण्याप्रती कटिबद्ध आहोत. पीक विम्याचे कमी प्रमाण पाहता हवामानाशी संबंधित विमा उत्पादनांचे विस्तारीकरण आवश्यक आहे. आमचा नर्चर.फार्मच्या दृष्टिकोनामध्ये दृढ विश्वास आहे आणि त्यांच्यासोबत दीर्घकालीन व उत्पादनक्षम सहयोगासाठी उत्सुक आहोत.’’