दैनिक स्थैर्य । दि. २९ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील सासवड येथे नर्सरी व्यवस्थापन हि गट चर्चा सत्र शेतकऱ्यांच्या समवेत संपन्न झाले. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे हॉर्टिकल्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन नर्सरी व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दिली.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, सासवड विकास सोसयटीचे चेअरमन विनायक अनपट, संचालक पोपट अनपट यांच्यासह सासवड पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे हॉर्टिकल्चर कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, प्रा. एन. एस. ढालपे , प्रा.एन. ए. पंडित, प्रा.एस. वाय. लाळगे व विषय मार्गदर्शक एस. एस. आडत यांचे मोलाचे मार्गदर्शन कृषिदूत अभिषेक जाधव, अक्षय जगताप, विराज कदम, दिपराज इंगळे, प्रसाद जाधव, हर्षवर्धन इंगळे व प्रज्वल धुमाळ यांना लाभले.