
स्थैर्य,मुंबई, दि १४: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील स्कॉर्पिओच्या नंबर प्लेटचं गूढ वाढलं आहे. या नंबर प्लेटच्या खेळातून वाझे तपास यंत्रणांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत की ते स्वत: गोत्यात येत आहेत, या बाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.