पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांची संख्या १.३ कोटींवर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑगस्ट २०२२ । मुंबई । भारत सरकारने (जीओआय) फेब्रुवारी २०२१ मध्ये फास्टॅग अनिवार्य केल्यापासून भारतात चारचाकी वाहनांसाठी फास्टॅगचा अवलंब झपाट्याने वाढला आहे.  ही सेवा सुरु झाल्यापासून पेटीएम फास्टॅगला वापरकर्त्यांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. एकसंधी ऑनबोर्डिंग, त्वरित सक्रियकरण आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा समर्थन यावर दिलेल्‍या भरामुळे ह साह्य झाले आहे. उल्लेखनीय बाब अशी आहे की पीपीबीएल १ कोटीहून अधिक पेटीएम फास्टॅग्स जारी करण्याचा टप्पा गाठणारी देशातील पहिली बँक बनली आहे.

ग्राहकांना फास्टॅग्स ऑफर करणा-या अनेक बँका असताना नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनसीपीआय) आणि नॅशनल हायवेज ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) यांनी शासित तंत्रज्ञानाचा लवकर अवलंब केल्यामुळे स्वदेशी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) या विभागामध्ये आघाडीवर आहे.

फास्टॅग्स असलेल्या वाहनावरील टॅग शोधण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी टेक्नोलॉजी डिवाईस (आरएफआयडी) वापरतात आणि टोल टॅक्सची रक्कम म्हणून लिंक केलेल्या डिजिटल वॉलेटमधून एकसंधीपणे रक्कम कापतात, ज्यामुळे टोल प्लाझावर आधी मोठा विलंब होण्यास कारणीभूत राहिलेल्या मॅन्युअल कलेक्शनची गरज पूर्णत: दूर झाली आहे.

पेटीएम फास्टॅग वापरण्याचे अव्वल ५ लाभ पुढीलप्रमाणे:

सुलभ खरेदी व जलद कार्यान्वित: ग्राहक अॅपच्या माध्यमातून बाय फास्टॅगवर क्लिक करत त्यांच्या वाहनासाठी पेटीएम फास्टॅग सुलभपणे खरेदी करू शकतात. त्यांना फक्त वाहन नोंदणी क्रमांक प्रविष्ट करून आरसीचे फोटोज अपलोड करावे लागतात. फास्टॅग खरेदीच्या वेळेनुसार डिलिव्हरी पत्त्यावर पाठवण्यात येईल. ग्राहकांना देशातील मोठ्या टोलनाक्यांजवळ पेटीएम फास्टॅग खरेदी करण्याचा पर्याय देखील आहे. पेटीएम फास्टॅग्समध्ये इतर प्रतिस्पर्धींच्या तुलनेत सर्वात जलद अ‍ॅक्टिव्हेशन वेळ आहे आणि ग्राहक ते प्राप्त केल्यापासून वापरू शकतात.

देशातील टोल प्लाझाचा सर्वात मोठा अधिग्रहणकर्ता: पीपीबीएल ही नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी) उपक्रमासाठी टोल प्लाझाची सर्वात मोठी अधिग्रहणकर्ता आहे, जी देशव्यापी टोल पेमेंट सोल्यूशन ऑफर करते. बँकेने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील २८० टोल प्लाझांना डिजिटल पद्धतीने टोल शुल्क वसूल करण्यासाठी सक्षम केले आहे.

टोल पेमेंट्ससाठी एक-थांबा सोल्यूशन: बँकांनी जारी केलेल्या फास्टॅग्सच्या तुलनेत पेटीएम फास्टॅग हे पेटीएम वॉलेटशी जोडलेले आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना अनेक वेळा रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. याचा अर्थ वापरकर्ते रिचार्ज करण्यासाठी कोणत्याही वेगळ्या खात्यात प्रवेश न करता प्रत्यक्ष पेटीएम वॉलेटवरून पैसे भरू शकतात.

टोल खर्चांवर एकसंधी देखरेख: पेटीएम फास्टॅग ग्राहकांना त्यांच्या सर्व टोल खर्चाचा मागोवा ठेवणे देखील सोपे करते. टोल पेमेंटसाठी पेटीएम फास्टॅग वापरणा-या कोणालाही प्रत्येकवेळी पेमेंट झाल्यानंतर नियमितपणे इन-अॅप नोटिफिकेशन्स व एसएमएस नोटिफिकेशन्स मिळेल. टोल पेमेंटसाठी केलेला खर्च वापरकर्त्यांच्या पेटीएम पासबुकमध्ये देखील दिसतो.

उच्च दर्जाची ग्राहक विवाद निवारण यंत्रणा: शेवटचे पण महत्त्वाचे म्‍हणजे पीपीबीएलची जलद निराकरणावर लक्ष केंद्रित करणारी कार्यक्षम ग्राहक विवाद निवारण यंत्रणा देखील आहे. ही यंत्रणा चुकीच्या कपातीची त्वरित माहिती देण्यामध्ये मदत करते आणि अतिरिक्त शुल्क परत करण्यासाठी दावे करण्याबाबत माहिती देते. उच्च दर्जाची विवाद व्यवस्थापन प्रक्रिया सर्व ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी ग्राहकांच्या तक्रारींचे, सहयोगी टोल व्यवहारांचे आणि टोल प्लाझाद्वारे उपस्थित केलेल्या समस्यांचे सखोलपणे ऑडिट करते.


Back to top button
Don`t copy text!