
दैनिक स्थैर्य । दि. २८ ऑक्टोबर २०२२ । फलटण । राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगाराने दीपावलीनिमित्त व भाऊबीजे निमित्त जादा प्रवासी वाहतूक करून सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. यामध्ये संपूर्ण सातारा विभागांमध्ये फलटण बस स्थानक आणि प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यावर्षी निर्बंध मुक्त दीपावली साजरी होत असताना फलटण बस स्थानकाने प्रवाशांना जलद व सुरक्षित सेवा देण्यामध्ये सुद्धा आपला क्रमांक पटकावला आहे.
फलटण आगाराचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण सुमारे 30 हजार किलोमीटरचा विक्रमी टप्पा फलटण आगाराने पार पाडलेला आहे. यामध्ये फलटण आजाराचे एकूण उत्पन्न 12 लाख 44 हजार रुपये इतके झालेले आहे.
फलटण आगाराचे प्रभारी आगार व्यवस्थापक रोहित नाईक, स्थानक प्रमुख राजेंद्र वाडेकर, वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे यांनी केलेल्या नियोजनाबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून कौतुकांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.