स्थैर्य, बीड, दि.२६: दसऱ्याच्या मुहुर्तावर आज
सावरगाव घाट येथे आयोजित दसरा मेळाळ्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी
आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी व्हर्जुअल माध्यमातून
संवादा साधला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. दरम्यान
त्यांनी आता नुसते भगवान गडावरच नाही तर मुंबईतील शिवाजी पार्कही भरवायचे
आहे. मी संपले असे म्हणणाऱ्यांना आपली ताकद दाखवून द्यायचा निर्धार पंकजा
मुंडेंनी केली. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर
केले, परंतु हे पॅकेज पुरेसे नसल्याचेही म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी
अजून थोडी उदारता दाखवावी असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
आता शिवाजी पार्क भरवायचेय
पंकजा
मुंडे म्हणाल्या की, मी राष्ट्रीय सचिव आहे. पण तरीही मी महाराष्ट्रातच
राहणार आहे. महाराष्ट्रात काम करणार आणि देशातही काम करणार आहे.
देशामध्येही ऊसतोड कामगार आहेत. त्यांचे प्रश्न देखील सोडवणार असल्याचे ते
म्हणाल्या. तसेच आता मी राज्यामध्ये फिरणार आहे. गावोगावात जाऊन पाहणी
करणार आहे. कोरोना असला तरीही मी गावागावात जाणार आहे. रस्त्यावर कसे
उतरायचे हे मला माहितीये. तसेच आता फक्त भगवान गडावरच नाही तर आपल्याला
मुंबईमधील शिवाजी पार्कही भरवायचे आहे. आपली शक्ती दाखवून द्यायची आहे असा
निर्धार पंकजा मुंडे यांनी केला आहे.
‘या’ पॅकेजमध्ये साधा रुमालही येणार नाही
पंकजा
मुंडे यांनी ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर टीका
केली आहे. उद्धव ठाकरेंनी 10 हजार कोटींचे पॅकेज घोषित केले. मी त्यांचे
स्वागत करते. मात्र शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी हे पॅकेज पुरेसे नाही.
या दहा हजार कोटीच्या पॅकेजमध्ये साधा रुमालही येणार नाही, अशी टीकाही
भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड हाल
झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा विरोधी पक्षांना
रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पंकजा मुंडेंनी दिला आहे.
मी घर बदलणार नाही
पंकजा
मुंडेंच्या पक्ष बदलाच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. त्यांनी
या चर्चांना आज पुर्णविराम दिला आहे. मी घर बदलणार नाही आहे तिथं आहे असे
त्या म्हणाल्या. तसेच आता राष्ट्रीय मंत्री झाले आहे. पक्षाच काम देशाच्या
पातळीवर करणार आहे असे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले.