सातार्‍यात कादंबरी लेखन कार्यशाळेचे आयोजन


स्थैर्य, 26 फेब्रुवारी, सातारा : राज्यातील पहिला मराठी भाषा पंधरवडा मसाप, शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यात आला. यंदा या मराठी भाषा पंधरवड्याचे 15 वे वर्ष असून यानिमित्ताने नवोदित, उदयोन्मुख लेखकांसाठी कादंबरी लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

पत्रकात, मराठी भाषा पंधरवड्यातंर्गत ही कादंबरी लेखन कार्यशाळा होणार असून ही कार्यशाळा रविवार दि. 1 मार्च रोजी सकाळी 9.30 ते 1 यादरम्यान नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये होणार आहे. या कार्यशाळेत ज्येष्ठ कादंबरीकार हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेसाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रवेश मर्यादित असून नावनोंदणीकरता सचिन सावंत 9860522606 या क्रमांकावर संपर्क साधावा. या कार्यशाळेत जास्तीत जास्त नवोदित, उदयोन्मुख लेखकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, उपाध्यक्ष विक्रम पाटील, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत आणि सातारा नगरपालिकेने केले आहे.


Back to top button
Don`t copy text!