दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी राजाळे (ता. फलटण) येथील जानाई मंदिर ते सरडे हा रस्ता खुला करावा व अतिक्रमण काढावे, अशी नोटीस बजावली आहे. याबाबत निखिल निंबाळकर यांनी पत्राद्वारे सर्व पुरावे फलटण तहसीलदार कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, गटविकास अधिकारी यांना सादर केले होते व निवेदनही दिली होती.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
राजाळे गावातील गट नं. ६२७ व ६२६ मूळ भोगवटादार बाळकृष्ण रामचंद्र बनकर यांची जागा श्री. संतोष पांडुरंग मेघे यांनी विकसन करार करून विकत घेतली होती. त्या जागेतून जाणारा जुना रस्ता महिलांसाठी मंदिरात जाणारा असून मूळ क्षेत्र १४१ चौ.मी. असून त्या रस्त्यावर अतिक्रमण करून व महाराष्ट्र शासन जागेत अतिक्रमण करून ३ गुंठे हून अधिक जागेत बांधकाम केले आहे. जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता हा रस्ता बंद केला आहे. याबाबत निंबाळकर यांनी नकाशा तयार करून सातारा जिल्हाधिकारी, तहसिलदार फलटण, पंचायत समिती फलटण यांना अहवाल सादर केला होता.
त्यानंतरही भूमि अभिलेख कार्यालयाने अतिक्रमण काढण्यास सांगितले असतानाही तहसीलदारांनी यांनी एक वर्ष झाले तरी अतिक्रमण काढलेले नाही व रस्ता खुला केला नाही. तसेच महाराष्ट्र शासन जागेत अतिक्रमण केलेले काढले नाही. त्यामुळे निंबाळकर यांनी तहसिलदार कार्यालय फलटण येथे १५ ऑगस्ट २०२४ रोजी आत्मदहन करणार आहे, असा इशारा दिला होता. त्यानंतर गटविकास अधिकारी, पंचायत समिती फलटण यांनी हा रस्ता खुला करण्याची व अतिक्रमण काढण्याची नोटीस राजाळे ग्रामपंचायतीस बजावली आहे.