दैनिक स्थैर्य । दि. २६ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । नोब्रोकर डॉटकॉम (NoBroker.com) या १०० टक्के ब्रोकरेज फ्री भारताच्या सर्वात मोठ्या रिअल इस्टेट व्यासपीठाने त्यांच्या नवीन फेरीमधील फंडिंगमध्ये २१० दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला आहे. कंपनी भाडे, खरेदी, गृहसेवा, आर्थिक सेवा व समुदाय व्यवस्थापन अशा सर्व प्रॉपर्टी संबंधित गरजांसाठी एक थांबा शॉप आहे. या फंडिंगसह नोब्रोकर भारतातील पहिले प्रॉपटेक युनिकॉर्न बनले आहे. यामुळे नोब्रोकरने उभारलेला एकूण निधी ३६१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. या फेरीचे नेतृत्व जनरल अॅटलांटिक, टायगर ग्लोबल मॅनेजमेंट आणि मूरे स्ट्रॅटेजिक वेन्चर्स यांनी केले.
नोब्रोकर डॉटकॉमने भाडे किंवा आऊटराइट सेल, मूल्यवर्धित सेवा- जसे गृहकर्ज, पॅकर्स अॅण्ड मूव्हर्स, कायदेशीर कागदपत्रव्यवहार, ऑनलाइन भाड्याचे पेमेण्ट अशा रिअल इस्टेट व्यवहारांच्या पैलूंसंदर्भात ग्राहकांसाठी युजर अनुभव सुधारण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. झीरो ब्रोकरेज खासियत असण्यासह कंपनीने ग्राहकांसाठी प्रक्रिया अधिक सोईस्कर व किफायतशीर केली आहे. कंपनी सध्या बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, मुंबई व पुणे या सहा शहरांमध्ये कार्यरत आहे. पोर्टलवर ७५ लाखांहून अधिक प्रॉपर्टीज नोंदणीकृत आहेत आणि १.६ कोटींहून अधिक व्यक्तींनी नोब्रोकर सेवांचा वापर केला आहे.
“नोब्रोकर सर्व रिअल इस्टेट गरजांसाठी भारताचे सर्वात मोठे एक-थांबा शॉप सादर करत आहे. फंडिंगची नवीन फेरी आम्हाला आमची तंत्रज्ञान क्षमता अधिक दृढ करण्यामध्ये, तसेच आमच्या गृहसेवा व आर्थिक सेवांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास मदत करेल. आम्ही अंतिम युजरसाठी संपूर्ण प्रक्रिया त्रासमुक्त व व्यवहार किफायतशीर करण्यासाठी मशिन लर्निंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतो,” असे नोब्रोकर डॉटकॉमचे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान व उत्पादन अधिकारी अखिल गुप्ता म्हणाले.
“आमच्यावर जनरल अॅटलांटिक, टायगर ग्लोबल व मूरे कॅपिटल अशा जागतिक गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या आत्मविश्वासाचा आनंद होत आहे. उभारण्यात आलेला हा निधी प्रामुख्याने आमचे सामुदायिक अॅप व बाजारस्थळ नोब्रोकरहूडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरण्यात येईल. आम्ही आतापर्यंत १०,००० सोसायटींसोबत करार केला आहे आणि पुढील दोन वर्षांमध्ये प्रबळ वाढ करत १ लाख सोसायटीजपर्यंत पोहोचण्याचा आमचा मनसुबा आहे,”असे नोब्रोकर डॉटकॉमचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमित अग्रवाल म्हणाले.