ना. श्रीमंत रामराजेंनी केला कु. स्वरा भागवतचा यथोचित सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२२ । फलटण । शिवजयंतीच्या निमित्ताने दि. १९ फेब्रुवारी रोजी कळसुबाई शिखर कमी वेळात म्हणजेच सुमारे दोन तासांमध्ये फलटण तालुक्यातील गोखळीच्या कु. स्वरा योगेश भागवतने सर करून अनोखा विक्रम तिच्या नावावर नोंदवला. याबद्दल विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कु. स्वराच्या कामगिरीचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.

विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील “लक्ष्मी पॅलेस” या निवासस्थानी कु. स्वरा भागवतचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक तथा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे, पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, निंभोरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुकूंद रणवरे, योगायोग डिजिटलचे नामदेव नाळे, स्वराचे वडील योगेश भागवत, लखन पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सात वर्षाच्या कु. स्वरा भागवत चालत जावून कमी वेळात शिखर सर करणारी स्वरा ही सर्वात लहान मुलगी ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सातारा जिल्ह्यासह राज्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कु. स्वराने यापूर्वी सायकलिंग एका मिनिटात १०० पुशअप, ५० प्रकारच्या दोरीच्या उड्या मारत तिच्या या कामगिरीची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!