दैनिक स्थैर्य । दि. २७ जुन २०२२ । फलटण । संपुर्ण कोळकीसाठी एकच पाणी पुरवठा योजना कशी करता येईल यासाठी सर्वे करावा लागणार आहे. विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कोळकीसाठी स्वतंत्र व स्वयंपूर्ण पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करता येतो. श्रीमंत रामराजेंच्यामुळे कोळकीतील कोणत्याही योजनेला निधी कमी पडू देत नाहीत. कोळकीच्या काही भागात जागेची व लेआऊटची योग्य नाहीत. कोळकीच्या मालोजीनगर भाग सोडता इतर ठिकाणी लेआऊट ठिक आहे, असे म्हणता येणार नाही, असेही मत यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत येणार्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून नळ पाणीपुरवठा योजनेचे भुमिपुजन कोळकीमध्ये वनदेवशेरी व महादेव मळा येथे संपन्न झाले. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, कोळकीच्या सरपंच सौ. विजया नाळे, जेष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, उपसरपंच संजय कामठे, माजी सरपंच कुंडलिक नाळे, कोळकीचे ग्रामविस्तार अधिकारी प्रभाकर लंगुटे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य अर्जुन रूपनवर यांच्यासह कोळकी ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुर्वीच्या काळी कोळकीच्या फक्त दोन ते तीन वस्ती होत्या. आता कोळकीचा विस्तार हा मोठ्या प्रमाणावर होत गेला. तालुक्यात फक्त सतरा सदस्य असलेली फक्त तीन ग्रामपंचायती आहेत त्यामध्ये सुध्दा कोळकीच मोठी आहे. कोळकीला कितीही पाणीपुरवठा योजना झाल्या तरी ते कमीच पडत आहेत व पडणार आहे. सुरवातीच्या काळात कोळकीमध्ये पुर्ण ताकतीने पाणी येत होते परंतु आता पाणीच कमी पडत आहे. आता ह्या होणार्या योजनेमुळे आगामी काळात काही दिवस तरी पाणी पुरवठा व्यवस्थित होईल, असा विश्वास ही यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
कोळकी गावामध्ये सुमारे दोन कोटीचे असलेले जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत येणार्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून नळ पाणीपुरवठा योजना ही कोळकीला कमीच पडणार आहे. कोळकीचा विस्तार हा मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये कोळकीच्या विस्ताराचा विचार करूनच योजना राबविण्यात येणार आहेत. विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यात कोणत्याही गावाला पिण्याचे पाणी कमी पडू न देण्यासाठी आपण सर्वजण कायमच कार्यरत आहोत, असे मत यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
कोळकीचा वाढता विस्तार पाहता योजना राबविण्यात आल्यानंतर काही दिवसांतच योजना अपुरी पडण्यास सुरुवात होते. कोळकीची योजना राबवताना पुढील ३० वर्षांचा विचार करून योजना राबिविणे गरजेचे आहे व ते आपण नक्की करू, असे आश्वासन आमदार दीपक चव्हाण यांनी दिले.
आदर्शवत ग्रामपंचायत बनवण्यासाठी प्रयत्न करा : श्रीमंत संजीवराजे
कोळकीमध्ये विविध प्रश्न सातत्याने डोकावत असतात. कोळकीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कोळकी ग्रामपंचायत ही सक्षम होणे गरजेचे आहे. कोळकीचा पुढील तीस ते पस्तीस वर्षांचा विचार करूनच कोळकीच्या योजना राबविणे गरजेचे आहे. कोळकी ग्रामपंचायत ही आदर्शवत ग्रामपंचायत बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आताच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.