
दैनिक स्थैर्य । 10 मार्च 2025। फलटण । फलटण शहराचा महत्वाचा भाग असणारे मलठणमध्ये पाणी, गटार, रस्ते, लाईट या सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्यात येणार आहेत; असे मत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या निवासस्थानी मलठणयेथील महिलांनी दूरध्वनीद्वारे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.
मलठण येथे नदीच्या शेजारी पाण्याच्या व गटाराच्या अनेक अडीअडचणी येत असतात. त्या येत्या पावसाळ्यापूर्वी सोडवण्यात याव्यात; अशी मागणी मलठण येथील महिलांनी माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्यातर्फे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना केली. त्यावेळी मलठण येथील महिलांना आश्वस्त करीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मलठणमध्ये मूलभूत सुविधा ह्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.