स्थैर्य, सातारा, दि.18 : उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयात कोरोना-19 या संसर्गजन्य आजारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सामाजिक अंतर (सोशल डिस्टंन्सींग) पाळणे आवश्यक आहे. यास्तव सोमवार दि. 22 जून 2020 पासून उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालय आवार नो पार्किंग झोन (NO PARKING ZONE) म्हणून घोषीत करण्यात येत आहे. संपूर्ण आवारामध्ये खाजगी वाहनास (चारचाकी, तीनचाकी, दोनचाकी) प्रवेश दिला जाणार नाही. या परिसरात येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने आपआपल्या जबाबदारीवर सुरक्षित ठिकाणी लावावीत. तहसिल कार्यालयाच्या परिसरात अनधिकृतपणे वाहन पार्किंग केल्याचे आढळून आल्यास पोलीस विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे, आवाहन उपविभागीय अधिकारी सातारा यांनी केले आहे.