काहीही झाले तरी आपला उमेदवार विधानसभेवर निवडून पाठवायचा; खासदार गटाचा फलटणमध्ये निर्धार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 08 ऑक्टोबर 2024 | फलटण | आगामी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काहीही झाले तरी आपल्या विचारांचा उमेदवार निवडून गेला पाहिजे; अशी आग्रही मागणी खासदार गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे केली. भारतीय जनता पार्टी कडून अधिकृत उमेदवारी मिळाली पाहिजे जर नाही मिळाली तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे मत यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

सुरवडी येथील हॉटेल निसर्गनजिक आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी फलटण – कोरेगाव विधानसभा निवडणूक ही आपण लढवायची की नाही? लढवायची झाल्यास कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची? जर आपल्याला महायुतीचा धर्म पाळण्याबाबत आग्रह धरण्यात आला तर आपण नक्की काय करायचे ? असे सवाल कार्यकर्त्यांना केले त्यावेळी विधानसभा ताकदीने लढवायची, भारतीय जनता पार्टीकडूनच निवडणूक लढवायची आहे, महायुतीचा धर्म पाळायचा झाल्यास लोकसभेला मित्रपक्षांनी ज्या पद्धतीने धर्म पाळला त्याच पद्धतीने आपण विधानसभेला महायुतीचा धर्म पाळायचा असे मत विविध कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

माजी खासदार रणजितसिंह यांनी गेल्या 30 वर्षात जो विकास झाला नाही तो माजी खासदार रणजितसिंह यांनी केला आहे. दिगंबर आगवणे बाबत नेहमी विरोधक बोलत असतात. परंतु दिगंबर आगवणे हे रणजितसिंह यांच्यासोबत काय वागले आहेत ते आम्हाला माहीत आहे. दिगंबर आगवणे यांना सुद्धा वेळोवेळी मी त्याला बऱ्याच गोष्टी समजावून सांगत होतो परंतु दिगंबर आगवणे हा रामराजे व संजीवराजे यांना मॅनेज झाला होता. त्यांच्याकडून दिगंबर आगवणे यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक पुरवठा होत होता; असे मत ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!