सातारा शहरात नो मास्क नो व्हेईकल मोहीम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०८ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा शहरांमध्ये सातारा नगरपालिका आणि सातारा वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने नो मास नो व्हेईकल ही मोहीम शुक्रवारपासून राबवण्यात आली या मोहिमेमध्ये मास्क नसणाऱ्या वीस पादचारी आणि तीस वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली दोन्ही कारवायांमध्ये एकूण तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सातारा शहरात व मायक्रोन ओमायक्रोन विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाले आहेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सातारा शहरांमध्ये या संक्रमणाचा प्रभाव रोखण्यासाठी प्रत्यक्ष उपाय योजना सुरू झाल्या आहेत सातारा नगरपालिकेचे एक पथक आणि शहर वाहतूक पोलिसांची तीन पथके असे एकूण पंधरा कर्मचाऱ्यांनी सातारा शहरातील मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे.

वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार वाडे फाटा हुतात्मा उद्यान चौक बॉम्बे रेस्टॉरंट चौक पोवईनाका राजवाडा चांदणी चौक समर्थ मंदिर चौक शाहू चौक इत्यादी ठिकाणी मास्क नसणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली यामध्ये मास्क न वापरणारे वीस पादचारी आणि मास्क न घालता वाहन चालवणाऱ्या तीस वाहनचालकांवर अशा पन्नास जणांवर कारवाई करण्यात आली यामध्ये एकूण तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला यापुढेही ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे विठ्ठल शेलार यांनी प्रभात शी बोलताना सांगितले.

सातारा शहर आणि परिसरात येणाऱ्या नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अद्यापही कोणतीही यंत्रणा सतर्क झालेली नाही . गेल्या आठवड्यात सातारा सातारा शहरात गेल्या आठवड्यात 73 नागरिक परदेशातून आल्याची नोंद प्रशासनाने घेतली मात्र या नागरिकांच्या तब्येतीचे अहवाल अद्याप प्राप्त होताना त्यामध्ये काही त्रुटी राहण्याची शक्यता आहे . गेल्या दोन दिवसात सातारा शहरात किती नागरिक दाखल झाले तसेच परत जिल्ह्यातून किती नागरिक साताऱ्यात आले याचा अहवालही अद्याप सातारा तालुका आरोग्य विभागाकडे उपलब्ध झालेला नाही सातारा शहरांमध्ये पुणे मुंबई सोलापूर सांगली कोल्हापूर येथून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण पुष्कळ आहे त्यामुळे प्रत्यक्षात या नागरिकांवर नियंत्रण कसे ठेवायचे आणि त्यासंदर्भात कोणती कार्यवाही करायची याबद्दल अद्यापही आरोग्य यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.


Back to top button
Don`t copy text!