
दैनिक स्थैर्य । 24 मार्च 2025। सातारा । कराड येथील सहापदरीकरण पुलाच्या सेगमेंटचे काम 15 मार्च रोजी सुरु होतो. यावेळी कामाप्रसंगी कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्त हानी झालेली नाही, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.एस. कदम यांनी दिली आहे.
कागल सातारा सेक्शन मधील सहा पदरीकरणाचे कामे प्रगतीत असून 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. कराड येथे six lane elevated flyover on single pierएकूण लांबी 3.47 कि.मी.) पुलाचे बांधकाम सुरु असून एकूण 91 स्पॅन पैकी 82 स्पॅन बसविण्यात आलेले आहेत. 9 स्पॅन बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दि. 15 मार्च रोजी 2025 रोजी या पुलावर उर्वरीत स्पॅन बसविताना पुलासाठीचे स्पॅन P85-P86 साठी सेगमेंट उभारणी करण्याचे काम सुरु होते. सेगमेंट बसविण्याचे काम सुरु असताना लाँचरमध्ये तांत्रीक बिघाड झाल्याने सेगमेंट जमीनीवर लाकडी ओंडका (Wooden plank) वर ठेवण्यात आला होता. परंतू सेगमेंटच्या वजनामुळे (अंदाजे 125 मे. टन, लांबी 29.5 मि. द 2.0 मि.) लाकडी ओंडका दबला गेला व सदरहू सेगमेंट जमीनीवर थोडा झुकला. यानंतर कोयना नदीवरील 350 मे. टन क्रेन मागवून सदरचा सेगमेंट सरळ करण्यात आला व योग्य ते पॅकिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोणतीही जिवीत वा वित हानी झालेली नाही किंवा कोणतेही नुकसान झालेले नाही, अशीही माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. कदम यांनी दिली आहे.